प्रतिनिधी – आज दिनांक 6 आॕगस्ट रोजी गोजूबावी येथील पालखी महामार्ग च्या जवळच गेले अनेक दिवसांपासून एक मनोरुग्ण रस्त्याच्या कडेला बसून रहात असे, या मनोरुगणास आज रोजी
शिवऋण ऋषभ प्रतिष्ठान जुन्नर, यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या प्रयत्नाने आज प्रतिष्ठानचे कार्यकर्ते गोजूबावी येथे सकाळी उपस्थित झाले, त्यावेळी सावंतवाडीचे पोलीस पाटील नितीन गटकळ, गोजूबावीचे पो.पा अशोक आटोळे, रणजीत खोमणे, रमेश गावडे (सवई),राजू गावडे यांच्या सहकार्याने त्या मनोरुग्णास प्रतिष्ठान ना प्रतिष्ठानला सुपूर्त करण्यात आले यासाठी गेले पंधरा दिवसांपासून प्रयत्न चालू असल्याचे स्थानिकांच्याकडून सांगण्यात आले

भविष्यात देखील अशा प्रकारचे मनोरुग्ण परिसरात आढळल्यास आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन शिवऋण ऋषभ प्रतिष्ठान जुन्नरच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *