प्रतिनिधी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 24 व्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने राष्ट्रवादी युवक चषक 2023 चे आयोजन 14 जुन ते 19 जुन 2023 रोजी करण्यात येणार आहे. यासाठी 9 जुन 2023 पर्यंत संघाची नोंदणी घेतली जाईल. शहरी भागामध्ये नव्याने सुरु झालेल्या कॉस्को बॉल बॉक्स (टर्फ) पद्धतीचे सामने संध्याकाळी 7 ते 11 यावेळेमध्ये होतील. बारामती शहरातील प्रत्येक प्रभागामधून संघ घेतले जातील. या संघास संघ मालक असेल, संघ मालक हे प्रभागातील नगरसेवक किंवा प्रमुख पदाधिकारी असतील संघ मालकाच्या नावाने टीम चे रजिष्ट्रेशन घेतले जाईल. यामध्ये 24 व्या वर्धापनदिनानिमित्त प्रथम क्रमांक 33000 सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकास 22000 व सन्नमनचिन्ह तृतिय 11000 व सन्मानचिन्ह, सहभागी प्रत्येक संघास सन्मान चिन्ह तसेच वयक्तिक स्वरूपाची अनेक बक्षीस असतील. अशी माहिती युवक अध्यक्ष अविनाश बांधल यांनी दिली आहे.