प्रतिनिधी ( गणेश तावरे ) शिक्षक दिनानिमित्त संस्था चालक, पुरुष शिक्षक, महिला शिक्षक यांचे स्वागत चंदूकाका सराफ अँड सन्स प्रा लि बारामती चे संचालक किशोर कुमार शहा सराफ यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व ठुसी महोत्सव फलकाचे अनावर करून झाली. किशोर कुमार शहा सराफ यांनी सर्व संस्था चालक व शिक्षक यांना शुभेच्छा दिल्या तसेच जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्रजी माध्यम भिकोबानगर पणदरे यांनी कोरोना महामारी मधील अनाथ मुलांचे पालकत्व घेतल्याबद्दल स्कूलचे अध्यक्ष शिवश्री विनोद जगताप यांचे विशेष कौतुक केले. व अशा समाजकार्याला मदत करण्याची हमी दिली. शिवश्री विनोद जगताप यांनी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रा लि बारामती यांच्या २०० वर्षे ७ वी पिढी या व्यवसायात यशस्वीपणे वाटचाल करीत असताना सामाजिक उपक्रमाची दखल घेत आहे याचे विशेष कौतुक करून त्यांच्या व्यवसायला सर्व शिक्षकांच्या वतीने शुभेच्छा दिल्या. संचालक किशोर कुमार शहा सराफ व त्यांचा मार्केटींग विभाग स्टाफ यांचे शिक्षक दिनानिमित्त सावित्री माई फुले हा ग्रंथ भेट देऊन आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *