प्रतिनिधी -तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रमुख लेफ्टनंट डॉ.विवेक बळे यांनी २० नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत एनसीसी ग्रुप मुख्यालय वडोदरा अंतर्गत राजपिपला येथे आयोजित सरदार पटेल नर्मदा ट्रेकिंग शिबिरात उत्कृष्ट कामगिरी आणि समर्पणासाठी त्यांना कौतुक पत्र प्रदान करण्यात आले. त्यांनी आपल्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन उच्च व्यावसायिक क्षमता, उत्साह आणि कार्य प्रदर्शित केल्याबद्दल ५ गुजरात बटालियन एन.सी.सी. सुरत चे उपकमान अधिकारी तसेच शिबिराचे प्रशासकीय अधिकारी कर्नल गौतम रॉय यांच्याकडून हे कौतुक पत्र प्रदान करण्यात आले. या कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांना सुंदरपूरा, कर्जन डॅम, जुनाराज इत्यादी विविध ठिकाणी ट्रेकिंग केले. लेफ्टनंट डॉ.विवेक बळे यांची २ महाराष्ट्र बटालियन एनसीसी पुणे यांच्यामार्फत या शिबीरासाठी निवड झाली आणि त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत शिबिराच्या ठिकाणी झालेल्या विविध स्पर्धांमध्ये हिरीरीने सहभाग घेऊन महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. सदर शिबिरामध्ये महाराष्ट्रातून एकूण १०२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यातील ५१ विद्यार्थी पुणे ग्रुप येथील असून ५१ विद्यार्थी मुंबई बी ग्रुप येथून होते. या शिबिरासाठी एकूण पाच विविध राज्यांमधून विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यामध्ये प्रामुख्याने गुजरात दिल्ली, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड महाराष्ट्र आणि उत्तराखंड इ. संचालनालयानी सहभाग घेतला होता. त्यांच्या या कार्याबद्दल महाराष्ट्र संचालनालयास स्मृतिचिन्ह व लेफ्टनंट डॉ.विवेक बळे यांना कौतुक पत्र प्रदान करण्यात आले.