बारामती मधील क्रिएटीव्ह सायन्स अकॅडमीच्या विध्यार्थ्यांनी NEET परीक्षेत मिळवले घवघवीत यश …

प्रतिनिधी – बारामती येथील क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी ने उज्वल यशाची परंपरा अबाधित राखत यंदाच्या वर्षी 2021 मध्ये NEET या परीक्षेमध्ये महाराष्ट्रात क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी चे विद्यार्थी अव्वल आले आहेत.

यामध्ये वर्षा घाडगे या विद्यार्थ्यांनीला over all विषयात 720 पैकी 622 मार्क्स मिळाले आहेत, तर बायोलॉजी विषयात 360 पैकी 355 मार्क मिळाले आहेत.

प्रतिक कुंभार या विद्यार्थ्यांला over all विषयात 720 पैकी 603 मार्क्स मिळाले आहेत तर बायोलॉजी विषयात 360 पैकी 355 मार्क मिळाले.

सोबतच NEET over all विषयात अकॕडमीचे 2 विद्यार्थी 600 मार्क च्या पुढे आहेत तर 8 विद्यार्थी 543 मार्कच्या पुढा आहेत व 12 विद्यार्थी 500 मार्कच्या पुढे आहेत
तसेच 12 विद्यार्थी बायोलॉजी विषयात 300 मार्कच्या पुढे आहेत

या यशाचे कौतुक करीत असताना क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी चे संचालक काळे सर व घाडगे सर यांनी विद्यार्थ्यांना सन्मानित करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

पुणे जिल्ह्यामध्ये क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी चा निकाल हा दरवर्षी चांगला लागत आसतो याहीवर्षी ॲकॅडमीने ही यशाची परंपरा अबाधित राखून आपले नाव गुणतालिकेत अव्वल ठेवले आहे यावर्षी NEET या परिक्षेत अकॅडमीच्या विद्यार्थींनी घवघवीत यश मिळवले आहे.

विद्यार्थ्यांबरोबरच क्रिएटीव्ह सायन्स अकॅडमी चे देखील कौतुक पालक करताना पहावयास मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *