बारामती, दि.22: बारामती तालुक्यातील मौजे आंबी खु. येथील नदीपात्रातील अनाधिकृत ३० ब्रास वाळूसाठा जप्त करण्यात आला असून त्याचा लिलाव २८ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ११ वाजता मौजे आंबी खु. येथे घेण्यात येणार आहे, अशी माहिती तहसिलदार विजय पाटील यांनी दिली आहे.
लिलावात भाग घेऊ इच्छिणाऱ्याला लिलाव सुरु होण्याच्या किमान 1 तासापूर्वी जाहीर अनामत रक्कम रुपये ५० हजार रोखीने भरणे आवश्यक आहे. लिलावधारकांनी नियमित वस्तू व सेवा कर भरत असलेचा पुरावा, पॅन कार्डची छायांकित प्रत व कागदपत्राची पूर्तता केल्यानंतरच लिलावधारकाला लिलावात सहभागी होता येईल. वाळू लिलाव निविदा भरताना संबंधितानी निवासाचा पुरावा, वाहन चालविणेचा परवाना यापैकी कोणताही एक पुरावा सादर करणे बंधाकारक आहे.
लिलावाच्या अटी, शर्ती व जागेचा तपशिल इत्यादी कार्यालयीन वेळेत तहसिल कार्यालय बारामती येथे पहावयास मिळेल असेही तहसिलदार पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाने कळवले आहे.
Post Views: 1,977