माळेगाव (प्रतिनिधी गणेश तावरे ) : पोलिस मित्र संघटना नवी दिल्ली, भारत या संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. संतोषदादा चौधरी यांच्या आदेशानुसार सूनीलभाऊ पाटील अध्यक्ष,महाराष्ट्र प्रदेश यांचे सूचनेनुसार मा. श्री. गजानन भगत कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने मौजे पिराची कुरोली तालुका पंढरपूर येथील श्री. सतिश सुरेश भुई यांची पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली या संघटनेच्या सोलापूर जिल्हा युवा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे, यावेळी माननीय श्री. गजानन भगत म्हणाले की श्री सतिश भुई यांचे सामाजिक कार्य युवकांचे संघटन तसेच सर्वसामान्य गोरगरीब जनता यांच्याशी जोडलेली नाळ व त्यांच्याशी असलेले आपुलकीचे नाते तसेच नेहमीच अडचणींत असणाऱ्याना मदत करण्याचा त्यांचा स्वभाव या सर्व गोष्टींचा विचार करून आपण त्यांची निवड केले आहे. तसेच त्यांच्या संघटन करण्याची धडपड आहे त्याचा नक्कीच पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत ही संघटना मजबूत करण्याकरता ते प्रयत्न करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो, यावेळी सतीश भुई यांनी मनोगत व्यक्त करताना पोलिस मित्र संघटना महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष गजानन भगत यांनी माझ्यावर खूप मोठी जबाबदारी दिली असून त्या पदाला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न मी करणार आहे. तसेच पोलिस मित्र संघटना ही देशातील विविध राज्यांमध्ये कार्यरत असून त्याचे काम खूप मोठ्या प्रमाणात आहे गावातील सर्वसामान्य पर्यंत पोहचवून शांतता व सुव्यवस्था निर्माण करण्याबाबत आम्ही प्रयत्नशील असणार आहे. संघटनेच्या माध्यमातून आडी अडचणी सोडवण्याकरीता प्रयत्न करून सर्वांना न्याय व हक्क मिळवून देऊ असे आश्वासन दिले.