प्रतिनिधी – बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथे सामाजिक कार्यकर्ते मच्छिन्द्र टिंगरे यांनी आपल्या बरोबर त्यांची दिवाळी या उपक्रमाचे आयोजन केले होते. दिवाळी निमित्ताने कपडे घेत असताना गरीब कुटुंबातील एका गरीब मुलांना कपडे घेण्याचे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आले होते. या उपक्रमास बारामती तालुका व शहरातील शेकडो लोकांनी भरघोस प्रतिसाद दिला.
सोमनाथ भिले,किरण आप्पा भोसले, रुपेश दुधाळ, रवी वाबळे योगेश गार्डी, आकाश दामोदरे,अजित पवार, अमृता काटे, प्रदीप नवले, संतोष नाळे, अंजु वाघमारे या इतर अनेक मान्यवरांनी जवळपास 250मुलांना कपडे उपलब्ध करून दिले.
शेतमजूर, वीटभट्टी कामगार, ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना कपड्याचे वाटप कारणासाठी मच्छिन्द्र टिंगरे यांनी नियोजन करून ऍड. सचिन वाघ झारगडवाडी गावचे सरपंच नितीन शेडगे उपसरपंच वैष्णव बळी ग्रामपंचायत सदस्य मालन टिंगरे, सामाजिक कार्यकर्ते सतीश कुलाळ, सामाजिक कार्यकर्त्यां अंजु वाघमारे यांच्या हस्ते या कपड्यांचे वाटप करण्यात आले. दिवाळसणात नवीन कपडे मिळाल्यामुळे सर्व मुलांच्या चेहऱ्यावर हसू उमटले.