डोर्लेवाडी (प्रतिनिधी, जावेद शेख) राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा (NMMS) यामध्ये न्यू इंग्लिश स्कूल, डोर्लेवाडी या विद्यालयाने यश मिळवले आहे. सदर परीक्षेत 18 विद्यार्थी समाविष्ट झाले होते, पैकी 07 विद्यार्थी पास झाले. आणि एक विद्यार्थिनी शिष्यवृत्ती धारक झाली. शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांची यादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ,पुणे कडून जाहीर झाली. यामध्ये कु.आदिती गणेश दळवी या विद्यार्थिनीने इतर मागास प्रवर्ग (O.B.C.) यामधून 108 वा क्रमांक मिळवून यश संपादन केले. सदर विद्यार्थिनीला प्रतिवर्षी रुपये बारा हजार प्रमाणे चार वर्ष (नववी ते बारावी ) एकूण 48 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. रयत शिक्षण संस्थेच्या ब्रीद वाक्याप्रमाणे ” कमवा आणि शिका ” ही उक्ती साध्य करत मुले स्वावलंबी होऊन आपलं शिक्षण पूर्ण करणार आहेत. त्यामधून कर्मवीर अण्णांचा मूलमंत्रच प्रत्यक्ष अमलात आणला असल्याचे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.सुनिल साळवे यांनी सांगितले. या सर्व विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख सौ.मनिषा जाधव व तज्ञ शिक्षक श्री. रामहरी खाडे , श्री.अर्जुन माने, श्री रणजित गायकवाड, श्री.अभिमान वाघमारे ,श्री. आनंदा कांबळे यांनी मार्गदर्शन केले. स्कूल कमिटी सदस्य , सरपंच , सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, समस्त ग्रामस्थ व मुख्याध्यापक श्री.सुनिल साळवे, उपमुख्याध्यापक श्री.बळीराम खवळे, पर्यवेक्षक श्री. धनंजय खराटे व सर्व शिक्षकवृंद यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले.