प्रतिनिधी – महात्मा गांधी जयंती निमित्त बारामती मधील पेन्सिल चौक येथे जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमानिमित्त पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय लेंडवे, सुप्रसिद्ध वकील सचिन वाघ, विकी वरे, सौ आशा शिरतोडे पोलीस कॉन्स्टेबल, गुन्हे शोध पथकाचे संतोष मखरे, श्री मदने व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी लेंडवे सरांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम सर्व विद्यार्थ्यांसाठी आबा पाटील यांनी आयोजित केला होता. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आबा पाटील, अनिकेत थोरात, वैभव करचे यांनी मोलाचे सहकार्य केले. महात्मा गांधीजींचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावेत हा मूळ हेतू डोळ्यासमोर ठेवून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना लेंडवे यांनी सांगितले की, गांधीजींचे कार्य हे खूप मोठे होते, सामान्य लोकांसाठी उपयुक्त असे कार्य गांधीजींनी केले, असा संदेश उपनिरीक्षक लेंडवे सरांनी विद्यार्थ्यांना दिला. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा आणि सदिच्छा कार्यक्रमाचे आयोजक आबा पाटील यांनी दिले.