नेत्र रुग्णांसाठी आनंदाची बातमी.. बारामती मध्ये प्रथमच कॉर्नियल टोपोग्राफी विथ OCT मशीन बारामतीकरांच्या सेवेत दाखल

बारामती येथील सुप्रसिद्ध अशा प्रिझ्मा आय केअर हॉस्पिटल मध्ये अत्याधुनिक असे कॉर्णीअल टोपोग्राफी विथ OCT मशीन नेत्र रुग्णांच्या सेवेसाठी बारामती पंचक्रोशी मध्ये प्रथमच उपलब्ध करून देत असल्याचे रुग्णालयाचे प्रमुख डॉ. हर्षल राठी यांनी कळविले आहे.
बुबूळ, काचबिंदू, डायबेटिक रेटीनोपॅथी इत्यादी आजारांसाठी हे मशीन अत्यंत उपयोगी असून डोळ्यांच्या अंतर्गत रचनेची तपशीलवार माहिती या मशीन द्वारे अचूक कळते. बारामती सह फलटण,दौंड ,इंदापूर ,पुरंदर तालुक्यातील व परिसरातील सर्व नागरिक पुणे मुंबईला न जाता या मशीनचा लाभ आपल्याच परिसरात बारामती येथे घेऊ शकतात.
या प्रगत तंत्रज्ञानामुळे डोळ्याच्या अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, नेत्रविकारांचे अचूक निदान , नागरिकांच्या डोळ्यांच्या समस्या त्याचबरोबर डोळ्यांची नियमित तपासणी यासाठीही बारामतीकर या आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेऊ शकतात, असे रुग्णालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
प्रिझ्मा आय केअर सेंटर खूप पूर्वीपासूनच बारामतीकरांना चांगली सेवा देत असून इथून पुढेही अत्याधुनिक मशीनद्वारे बारामती व परिसरातील नागरिकांना सेवा देण्यास कटिबद्ध आहे. आमचे हॉस्पिटल बारामती परिसरातील एकमेव बुबुळ प्रत्यारोपण सेंटर असुन या नव्या मशीनद्वारे बुबुळावरील किचकट आजारांचे निदान व उपचार योग्य पध्दतीने करता येईल
तरी परिसरातील सर्व नागरिकांनी या अत्याधुनिक सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन रुग्णालयाचे डॉ. हर्षल राठी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *