बारामती, प्रतिनिधी (गणेश तावरे) –
मागील काही महिन्यापासून इंदापूर पोलीस ठाणे हददीतून मोटार सायकल चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले होते. मा. पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामिण श्री अंकित गोयल सो, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. आनंद भोईटे सो, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. गणेश इंगळे सो यांनी बैठक घेवून मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आनण्याबाबत मार्गदर्शक सुचना दिल्या त्याप्रमाणे
पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याची जबाबदारी गुन्हे
शोध पथकास दिली होती. याप्रमाणे गुन्हे शोध पथकाने पोलीस ठाणे अभिलेखावरील मो. सायकल चोरी
करणारे आरोपी तसेच इंदापूर शहर परिरातील अनेक सीसीटिव्ही कॅमे-याचे फुटेज तपासून तांत्रिक
माहिती वरून संशयीत इसम नामे १ विनोद महादेव पवार वय २४ वर्षे, रा. सरस्वती नगर, इदांपूर, जि.
पुणे २. अतुल मारूती काळे वय १९ वर्षे, रा.निमगाव, ता. माढा, जि. सोलापूर यांना ताब्यात घेवून गुन्हा कबूल केला . सदर आरोपीत यांनी इंदापूर, टेंभूर्णी, कुर्डवाडी, फलटण परिसरातून मोटार सायकल चोरी केल्याचे कबुल करून त्यापैकी काही मोटार सायकल इसम नामे. ३. योगेश मच्छिंद्र सुरवसे वय ३२ वर्षे, रा. बार्डी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर यास विक्री केल्या असल्याची
माहिती दिल्याने नमुद इसमासही ताब्यात घेवून तिनही आरोपीत यांच्याकडून आता पर्यंत पल्सर, युनिकॉर्न, स्पेलंडर, एच एफ डिलक्स, शाईन अशा वेगवेगळया कंपनीच्या अंदाजे ७ लाख रूपये किंमतीच्या २१ मोटार सायकल हस्तगत करण्यात आलेल्या असून खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. अनु इंदापूर टेंभुर्णी सोलापूर कुर्डुवाडी फलटण या पोलीस ठाणे इत्यादी गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहेत. तिनही आरोपी सध्या पोलीस कोठडीमध्ये असून आणखीन ही गुन्हे उघडकीस येण्याच्या शक्यता आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामिण श्री अंकित गोयल सो, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. आनंद भोईटे सो, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गणेश इंगळे सो यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, सहायक फौजदार प्रकाश माने, ज्ञानेश्वर जाधव, पोलीस नाईक सलमान खान, पोलीस कॉन्टेबल नंदू जाधव, गजानन वानोळे, होमगार्ड लखन झगडे यांनी केलेली आहे.