प्रतिनिधी (गणेश जाधव ) भिगवण व परिसरामध्ये गेल्या काही दिवसात मोटरसायकल चोरीस गेलेल्या तक्रारी येत होत्या त्या अनुषंगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर भिगवण पोलिस स्टेशन मधील पथकाने त्यानंतर गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळालेल्या बातमीचे अनूषंगाने आरोपी नितीन पोपट लोंढे रा खुडुस जि सोलापुर, अनिल अकुश काळे रा वेळापुर, राजु उर्फ आप्पा मोहन चव्हाण रा सिन्नर फाटा,नाशिक या आरोपींना ताब्यात घेवुन त्यांचे कडे चौकशी केली असता
त्यांनी १) भिगवण २) हडपसर ३) लोणी काळभोर ४) लोणावळा शहर, ५) नारायणगाव अशा वेगवेगळया पोलीस स्टेशनच्या हददीत मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली. सदर आरोपींना विश्वासात घेवुन त्यांचे कडुन तपासा दरम्यान अंदाजे ४,१०,००० रूपये किंमतीचे एकुण ०९ मोटारसायकली हस्तगत केलेल्या आहेत.
सदरची कामगीरी मा पोलीस अधिक्षक श्री अभिनव देशमुख सो , मा अप्पर पोलीस अधिक्षक श्री मिलींद मोहीते सो,मा. पोलीस उपविभागीय अधिकारी श्री नारायण शिरगावकर सो मा. सहायक पोलीस निरीक्षक श्री जिवन माने सो यांचे मार्नदर्शनाखाली पोसई विनायक दडस पाटील सो, सहा. फौजदार काळभोर, पो हवा वाघमारे, पो ना संदिप पवार, पोकॉ महेश उगले, पो का अंकुश माने यानी केली आहे.