माळेगाव (प्रतिनिधी, गणेश तावरे) पाहुणेवाडी येथे दि.२१मे रोजी स्वर्गीय जयकुमार भाऊ तावरे कॉम्प्लेक्स तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते मा.अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते पार पडले. उद्घाटनानंतर दादांनी आपल्या भाषणातून पाहुणेवाडी येथील सार्वजनिक कामे सर्व मार्गी लावू तसेच बारामती फलटण रोडचे काम लवकरात लवकर सुरू होणार आहे असे सांगितले . नवीन पिढीनी नोकरीच्या शोधात न पडता स्वतःचे उद्योग व्यवसाय निर्माण करावे असा कानमंत्र दादांनी युवकांना दिला.
पाहुणेवाडी येथे बरेच दिवसापासून अवैध धंदे राजरोसपणे चालू आहेत त्याबद्दल ग्रामस्थांनी वारंवार पोलिसांना कल्पना देऊनही अवैध धंदे चालूच होते त्याबद्दल अजितदादा पवार यांनी माळेगाव पोलीस यांना संबंधित अवैध धंद्यासाठी कडक कारवाई करण्यात यावी असे सांगण्यात आले .
सदर उद्घाटन प्रसंगी मा.अजित दादा पवार यांचा सत्कार पाहुणेवाडी ग्रामपंचायतचे सरपंच मा. भगवान आप्पा तावरे यांनी केला .प्रमुख उपस्थितीत माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.बाळासाहेब भाऊ तावरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मा.संभाजी नाना होळकर बारामती सहकारी बँकेचे चेअरमन मा.सचिन शेठ सातव बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा.सुनील पवार पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दत्तात्रय येळे सर तसेच मदन नाना देवकाते पंचायत समितीचे माजी सभापती करण खलाटे, धनवान काका वदक बारामती दूध संघाचे चेअरमन मा.संदीप जगताप पंचायत समितीचे माजी सभापती संजय भोसले , बार असोसिएशनचे मा.अध्यक्ष मा. Ad. विजयराव तावरे ,तसेच पाहुणेवाडी येथील समस्त ग्रामस्थ व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार युवा कार्यकर्ते व पाहुणेवाडीचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मा.जयराम भगवानराव तावरे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *