प्रतिनिधी – बालकांचे लैंगिक शोषण झाल्यानंतर शासनाची सर्वात प्रथम जी यंत्रणा कार्यान्वित होते ते म्हणजे पोलीस. निर्भया प्रकरणानंतर बालकांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण होण्यासाठी लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 अस्तित्वात आला. त्यामध्ये वेळोवेळी सुधारणाही झाल्या. त्यामध्ये पोलिसांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते पीडित बालकाला व त्यांच्या पालकांना संरक्षण देऊन त्यांना सर्वतोपरी मदत मिळवण्याची प्रमुख भूमिका पोलीस हे इतर विभागांना घेऊन करत असतात. पोलीस अधिकारी व कर्मचारी या कायद्याच्या तरतुदींबाबत अद्यावत असण्यासाठी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांच्या संकल्पनेतून निर्माण बहुउद्देशीय विकास संस्था व मैत्री नेटवर्क यांनी या कायद्याबाबतचे एकदिवसीय पोलिसांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणाचे उद्घाटन बारामती विभागाचे प्रमुख अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांनी केले सदरचे प्रशिक्षण बारामती पंचायत समिती हॉल या ठिकाणी घेण्यात आले. हे प्रशिक्षण आयोजित करण्यामध्ये पोलीस निरीक्षक सुनील महाडिक निर्माण संस्थेचे संकेत माने दिपाली कांबळे वैशाली भांडवलकर यांनी पुढाकार घेतला या प्रशिक्षणामध्ये कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा व पोलिसांची भूमिका याबाबत व कलम 498 बाबत विजयसिंह मोरे माजी अतिरिक्त सरकारी वकील यांनी माहिती दिली सुमित्र आष्टीकर मेंटॉर बालकल्याण समिती यांनी पोस्को कायद्याबाबत अध्यायावत माहिती दिली महिलांसाठीच्या वन स्टॉप योजने बाबत माहिती शुभांगी घरबुडे सखी वन स्टॉप सेंटर एक यांनी दिली या कार्यक्रमाचे समारोप भाषण माननीय उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांनी केले कार्यक्रमाचा समारोप रवी पवार निर्माण संस्था यांनी केला. या प्रशिक्षणासाठी गटविकास अधिकारी बागल यांनी पंचायत समिती हॉल विनामूल्य उपलब्ध करून दिला. बारामती विभागातील 100 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना या कायद्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *