प्रतिनिधी – उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल बारामती विभागाचे पोलीस उपअधीक्षक(DYSP) श्री गणेश इंगळे , मनसे प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड.सुधीर पाटसकर , भाजप प्रदेश सरचिटणीस सचिन भाऊ आरडे, दूध संघाचे चेअरमन संदीप जगताप, संजय गांधी योजनेचे मा.अध्यक्ष किरण तावरे, सुखदेव हिवरकर, वैद्यकीय अधीक्षक, डॉ. सदानंद काळे, BJP पुणे जिल्हा महाराष्ट्र् प्रदेश- उपाध्यक्ष अ‍ॅड.गोविंद देवकाते, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष एम डब्ल्यू जोशी. आदींच्या उपस्थितीत आयोजित भरगच्च कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन मुख्य संयोजक आर.पी.आय(ए) पुणे जिल्हा सचिव सुनील शिंदे,विजय (डॅडी) सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेते साधू बल्लाळ, उमेश दुबे यांनी केले होते. बारामतीतील जेष्ठ नागरिक संघ सभागृहात सदरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी गरजू 102 शालेय विद्यार्थ्यांना शालेय पोशाख, शालेय साहित्य वाटप करण्यात आले, तसेच समाजात योगदान देणारे वकील डॉक्टर पत्रकार व जेष्ठ नागरिक यांचा उल्लेखनीय कार्याबद्दल संविधान प्रास्ताविका ट्रॉफी, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कुचेकर यांचा देखील सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed