श्री छत्रपती शाहू हायस्कूल मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना विनम्र अभिवादन

प्रतिनिधी – रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज बारामती येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमास माननीय प्राचार्य बी एन पवार सर उपमुख्याध्यापक श्री पी एन तरंगे सर पर्यवेक्षक श्री बी ए सुतार सर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी प्रतिमा यांनी प्रतिमा पूजन केले.
या कार्यक्रमास अक्षय पवार ,ओंकार लोखंडे ,रोहन नाळे या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या विषयी माहिती दिली तसेच शिक्षक प्रतिनिधी गायकवाड एन जी यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या विषयी काही प्रसंग सांगितले.अध्यक्षीय भाषणात माननीय प्राचार्य बी एन पवार सर हे म्हणाले सत्य जगाला सत्य अहिंसा आणि सहिष्णुता याची शिकवण ज्यांनी दिली असे महात्मा गांधी आणि जय जवान जय किसान हा नारा देणारे लालबहादूर शास्त्री यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे आयोजन सोनाली हांडे व मथुरा कुंभार यांनी केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका कदम तर आभार सोनाली हांडे यांनी मांडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *