प्रतिनिधी – शेतीपूरक नवउद्योजक निर्माण व्हावेत यासाठी ग्रामस्थ लवंग आणि मंडळ कृषी अधिकारी अकलूज आयोजित आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत कृषी विभागाचे महत्वकांक्षी योजना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना कार्यशाळा सुभद्रा हॉल लवंग येथे पार पडली.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती उपविभागीय कृषी अधिकारी पंढरपूर श्री सर्जेराव तळेकर यांची होती. गरजेनुसार आणि क्षमतेनुसार उद्योग उभा करून तो कार्यरत राहील यासाठी लाभ घेणाऱ्या उद्योजकांनी प्रयत्न करावेत असे आवाहन यावेळी श्री. तळेकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला उपस्थित जिल्हा संसाधन अधिकारी समाधान खुपसे यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना बाबत सविस्तर माहिती दिली. रुपाली पवार संस्थापिका गौरी सोहम गृह उद्योग माळीनगर यांनी त्यांना आलेले अनुभव नवीन उद्योग उभा करणाऱ्या उपस्थितासमोर मांडले. श्री संतोष सोनवणे मॅनेजर बँक ऑफ इंडिया अकलुज, यांनी बँकेबल प्रोजेक्ट च्या संदर्भात असणाऱ्या शंकेचे निरसन करून अधिकाधिक चांगले प्रोजेक्ट सादर करण्याबाबत आवाहन केले. श्री धनंजय कपणे यांनी केळी पिकाविषयी लागवड ते काढणी पर्यंत मार्गदर्शनपर माहिती दिली.
यावेळी कुबेर रेडे पाटील कृषिभूषण शेतकरी तसेच सतीश कचरे प्रभारी तालुका कृषी अधिकारी माळशिरस, श्री दत्तात्रय गायकवाड मंडळ कृषी अधिकारी अकलूज, डॉ.विक्रम दीक्षित पशुधन विकास अधिकारी, श्री संजय फिरमे मंडळ अधिकारी महसूल विभाग, श्री.मोहन मिटकल ग्रामविकास अधिकारी लवंग, अकलूज कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक कृषी सहाय्यक, लवंग व पंचक्रोशीतील मधील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक लवंग गावचे कर्तव्यदक्ष पोलीस पाटील विक्रम भोसले यांनी केले. कार्यक्रमाचे आभार ग्रामपंचायत सदस्य धनाजी चव्हाण सर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब सरवदे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed