प्रतिनिधी – वृक्षारोपण ही काळाची गरज आहे हे ओळखून महाशिवरात्री चे औचित्य साधून पर्यावरनिय शिवरात्र साजरी करण्यात आली. या उपक्रमाचे नियोजन विकांत गुळवे यांनी केले असून यामध्ये बाबु पवार, राजे ग्रुप अध्यक्ष धिरज देवकर, ग्रां.पं.सदस्य धनंजय गायकवाड, जेष्ठ नेते तात्या पाटील ,आशिष देवकर, सुशांत देवकर, शेखर देवकर, श्रीपाद साखरे, हनुमंत कोळेकर, गणेश वाघ, आदित्य मोहिते, नागेश कानगुडे, योगेश ज्योतिराम देवकर, ओंकार मोहिते यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. महाशिवरात्री निमित्ताने मंदिरामधे महापुजेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच भजनाचे आयोजन करण्यात आले होते. विक्रांत गुळवे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम अतिशय सुंदर प्रकारे पार पडला व परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक देखील केले.
![](https://shetkariyoddha.com/wp-content/uploads/2022/03/IMG-20220305-WA0029.jpg)