प्रतिनिधी – बारामती शहरामध्ये दुपारी व सायंकाळी दोन शिफ्ट मध्ये बरेच कॉलेज सुरू असतात. कॉलेज सुटण्याच्या वेळेस अनेक मुले विना नंबर प्लेट तसेच विनाकारण कॉलेज शाळा परिसरामध्ये मोटरसायकली घेऊन जोरात आवाज करून फिरत असतात. निर्भया पथक सुद्धा त्यावर सतत कारवाई करत असते परंतु काल एकाच वेळी बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस उपनिरीक्षक घोडके, मोटे, पाटील यांच्या चार टीम तयार करून एकाच वेळी वेगवेगळ्या कॉलेजवर पाठवल्या व टीसी कॉलेज आणि अनेकांत शाळा, राधेश्याम टेकनिकल शाळा, रमाकांत शाळा, शाहू हायस्कूल, या ठिकाणी पोलिसांनी साध्या कपड्यात जाऊन दुपारी तीन वाजता कॉलेज सुटण्याच्या वेळेस मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली आहे. सर्व शिक्षक पालक यांना सुद्धा याबाबत अवगत केले आलेले आहे.
अनेक मुलांकडे आई-वडिलांनी घेऊन दिलेल्या स्वयंचलित स्पोर्ट बाईक आहेत, आई-वडिलांनी सुद्धा आपल्या मुलाच्या ताब्यात गाडी घेताना त्याच्याकडे लायसन्स आहे का ? त्याचं वय आहे का ? हे पाहिले पाहिजे.. आज पालकांना सुद्धा वाहतुकीचा दंड टाकण्यात येणार आहे. विना नंबर चालकास गाडी चालवायला देणे हे मालकाला पाच हजार रुपये दंड होतो. याबाबत पुढे देखील कठोर कारवाई करण्यात येईल असे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सांगितले.