प्रतिनिधी – आगामी सणासुदीच्या दिवसांमध्ये आकाशामध्ये पतंग उडवले जातात या पतंगाची दोर कोणी काटू नये म्हणून निष्काळजी पतंगबाज नायलॉन मांजाचा वापर करत आहेत हे नायलॉन मांजाचे दोर तसेच वातावरणामध्ये पतंग उडवून संपल्यानंतर लटकत असतात येणारे जाणारे मोटरसायकल प्रवासी वाहनचालक पशु पक्षी जनावरे हे रोडने जात असताना हे नायलॉन दोरी त्यांच्या निदर्शनास येत नाहीत आणि त्यांचा फास गळ्याला किंवा इतर नाजूक अवयवाला लागून ते जखमी होतात किंवा अनेक वेळा गतप्राण झालेल्या सुद्धा घटना आहेत. म्हणजे एक प्रकारे जसा वातावरणात विषारी वायू प्रदूषण करतात तसाच हे नायलॉनचे दोर सुद्धा वातावरण व पर्यावरण खराब करतात त्यामुळे शासनाने या नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी घातलेली आहे तरीसुद्धा काही विक्रेते हे नायलॉन मांजाची विक्री करत असतात बारामतीतील काही पत्रकार व समाज सेवकांनी याबाबतीमध्ये आठवड्यापूर्वी सोशल मीडियावर आवाज उठवला होता तेव्हापासून बारामती शहर पोलीस ठाणे याबाबत कारवाई करण्यासाठी माहिती काढत होती काल संध्याकाळी पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांना माहिती मिळाली की इसम नामे शाहरुख निसार अत्तार वय 34 वर्ष राहणार काशी विश्वेश्वर मंदिराजवळ याचे मार्केटमध्ये दुकान असून त्यांनी त्याच्या घरी नायलॉन मांजा विक्रीसाठी आणलेले आहेत अशी माहिती मिळताच महिला पोलीस उपनिरीक्षक संध्या देशमुख, सहाय्यक पोलीस फौजदार संजय जगदाळे, पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे, पोलीस पोलीस अंमलदार दशरथ कोळेकर, मनोज पवार, कल्याण खांडेकर, अजित राऊत, बंडू कोठे, अक्षय सिताप यांची वेगवेगळी पथके तयार करून मार्केट मधील बारा दुकाने चेक केली तसेच शाहरुख निसार आत्तार वय 34 याचे घर चेक केले असता त्या ठिकाणी विविध रंगाचे नायलॉनचे 17 बंडल नायलॉन मांजा किंमत अंदाजे सात हजार रुपये हा त्या ठिकाणी मिळून आला त्याच्या मांजा हा दोन पंचा समक्ष जप्त करण्यात आला असून त्याच्यावर बारामती शहर पोलीस ठाण्यात भादवि कलम 188 336 278 प्रमाणे पर्यावरण अधिनियमाप्रमाणे घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यापुढे सुद्धा शहर पोलीस ठाण तर्फे याबाबत छापीमारी करून गुन्हे दाखल करण्यात येणार आहे नायलॉन दोर पतांगबजी मध्ये जर बारामती मध्ये कुनी जखमी झाला किंवा जर नायलॉन मांजा लागून मृत्यू झाला तर सदोष मनुष्यवधासारखा सुद्धा गुन्हा दाखल करण्यात येईल त्यामुळे सर्व व्यापाऱ्यांनी नायलॉन मांजा विक्रीसाठी बारामती मध्ये आणू नये असे आव्हान पोलिसांतर्फे करण्यात येत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या आदेशाने करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *