प्रतिनिधी – जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्या दरम्यान शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तर्फे जंक्शन येथे पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना मोफत औषधे वाटप करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन विद्यामन पोलीस आयपीआय श्री लातूरे व त्यांचे सहकारी यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. त्यानंतर लागलीच वारकऱ्यांना मोफत औषधे वाटप करण्यात सुरुवात झाली. डॉक्टर मोरे व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष बारामती तालुका समन्वयक श्री सतीश महादेव गावडे व युवासेना श्री वैभव हगारे, सागर पोरे व श्री प्रवीण भोसले, अजय सपकाळ, भूषण सुर्वे पुणे जिल्हा समन्वयक यांनी सर्व वारकऱ्यांना मोफत औषधे वाटण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *