प्रतिनिधी – मौजे -मुढाळे येथे दि. 27/06/2022 रोजी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत 25 जुन ते 1जुलै या कालावधीत कृषी संजीवनी मोहिम राबविली जात आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हनुन मुढाळे येथे दि. 27/6/2020 रोजी दरेकर वस्ती येथे कृषी संजीवनी कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मकाया पिकावरील महिला शेतीशाळेचे आयोजन करण्यातआले होते. या वेळी मका पिकाचे पिक उत्पादन तंत्रज्ञान बियाणे उगवण क्षमता चाचणी, बिजप्रक्रिया, अमेरिकन लष्करी अळी, नियंत्रणासाठी फेरोमन ट्रॅप वापर, सुपर केन नर्सरी प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. तसेच प्रधानमंत्री सुक्ष्म प्रक्रिया उद्योग फळबाग लागवड अपघात विमा योजना, सुक्ष्म सिंचन व कृषी यांत्रिकीकरण योजना या विषयी माहिती देण्यात यावेळी पोषण युक्त संरक्षित अन्न योजनेअंतर्गत भाजीपाला मिनी किट उपस्थित महिलांना वाटप करण्यात आले. वरीलप्रमाणे महिला तंत्रज्ञान सक्षमीकरण दिना निमित्त तंत्रज्ञान प्रसार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन ज्योती दरेकर व मार्गदर्शन कृषी सहाय्यक आरती कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार कल्पना थोरात यांनी मानले.