प्रतिनिधी – रावणगाव,नंदादेवी, तालुका- दौंड, येथे आज दिनांक २८ जुन रोजी कृषि संजीवनी सप्ताह साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषि पर्यवेक्षक संजय कदम यांनी करुन उपस्थित शेतकऱ्यांना कृषी संजीवनी सप्ताह बाबत माहिती दिली, तसेच या सप्ताहात २८ जुन हा खत बचत दिन म्हणून साजरा करताना जमीन आरोग्य पञिकानुसार खतांचे नियोजन, महत्त्व,बचत या बाबत मार्गदर्शन केले. कृषि सहाय्यक अतुल होले यांनी कृषि विभागाच्या विविध योजना, एम आर इ जी एस अंतर्गत फळबाग लागवड,प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना, महाडीबीटी योजना, याबाबत माहिती दिली, कृषि सहाय्यक अझरुद्दीन सय्यद यांनी एकरी शंभर टन ऊस उत्पादन या बाबत मार्गदर्शन करुन श्री तुकाराम धायतोंडे यांच्या शेतावर ऊस बेणे निवड, बेणे प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखविले. या प्रसंगी रावणगाव येथील माजी उपसभापती उत्तम आप्पा आटोळे, ग्रामपंचायत सदस्य हौशीराम आबा आटोळे,रावणगाव चे ग्रामविकास अधिकारी शशिकांत शिंदे, नंदादेवी सोसायटीचे माजी चेअरमन किरण गावडे, नंदादेवी येथील प्रगतशील शेतकरी अविराज गावडे, तुषार आटोळे,किरण आटोळे, दिपक चव्हाण,शिवशाल शेळके,दादा फाजगे आदी शेतकरी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व आभार प्रदर्शन कृषि सहाय्यक अंगद शिंदे यांनी केले.