प्रतिनिधी – दिनांक 25/06/2022 रोजी दौंड मधील मौजे स्वामी चिंचोली येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी दौंड श्री राहुल जी माने यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी संजीवनी मोहीम च्या अनुषंगाने शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे ग्रामपंचायत सदस्य धनंजय मत्रे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंकर गणपत कांबळे कृषी सहाय्यक स्वामी चिंचोली यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजना एम आर इ जी एस अंतर्गत फळबाग लागवड, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना, महाडीबीटी योजना, एकरी शंभर टन ऊस उत्पादन, सुपर केन नर्सरी प्रात्यक्षिक लॅपटॉप वर दाखवले, श्री अतुल होले कृषी सहाय्यक खडकी यांनी पोषणयुक्त सुरक्षित अन्न योजनेची माहिती दिली. श्री एस एस कदम कृषी पर्यवेक्षक पाटस 2 यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली व विचारलेल्या शंकांचे निरसन केले. आभार प्रदर्शन शंकर गणपत कांबळे कृषी सहाय्यक स्वामी चिंचोली यांनी केले. कार्यक्रमास उपस्थित शेतकरी विठ्ठल मदने माजी ग्रामपंचायत सदस्य, गोरख शिंदे, ज्योतीराम गुणवरे,संतोष शिंदे, भागवत शेंद्रे, सोमनाथ वेताळ, शैलेंद्र कांबळे व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वामी चिंचोली येथे कृषी संजीवनी मोहीमेच्या अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
