प्रतिनिधी – दिनांक २७/६/२०२२ रोजी मौजे वरवंड येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी दौंड, राहुल माने यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी संजीवनी मोहीम साजरी करण्यात आली. राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना तसेच पीक सल्लाविषयक माहिती शेतकऱ्यांच्या बांधावर नेण्यासाठी राज्यभर हा कार्यक्रम राबविला जात आहे. यावेळी कृषी सहाय्यक मोनिका दिवेकर यांनी महिला कृषी तंत्रज्ञान सक्षमीकरण यावर महिला चर्चा सत्र, प्रक्रिया उद्योग, सेंद्रिय शेती विषयी माहिती दिली. तसेच पोषणयुक्त सुरक्षित अन्न योजना विषयी महिलांना मार्गदर्शन करण्यात आले व भाजीपाला मिनीकीट ग्रामपंचायत सदस्य मिराताई दिवेकर यांच्या हस्ते देण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी सहाय्यक राहुल यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी कृषी पर्यवेक्षक श्री पी .एम . चिपाडे व महीला शेतकरी उपस्थित होत्या.