बारामती : येथील राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट व ज्युनिअर कॉलेज बारामतीचे या वर्षीच्या इ 10 वी च्या परीक्षेत अभूतपूर्व यश मिळवले आहे.विद्यालयाचा निकाल 99.16% लागला असून 358 विद्यार्थी या परीक्षेस बसले होते त्यापैकी 355 विद्यार्थी पास झाले आहेत.यामध्ये 103 विद्यार्थी विशेष प्राविण्य,151विदयार्थी प्रथम श्रेणीत तर 91 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर 9 विद्यार्थी पास श्रेणीत आले आहेत.या विद्यार्थांमध्ये कु.गौरी दत्तात्रय आटोळे हिने 99.20% गुण मिळवून विद्यालयात तसेच बारामती तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. द्वितीय क्रमांक चव्हाण युगंधर सुभाष याने 97.60 %गुण मिळवून प्राप्त केला तर तृतीय क्रमांक गावडे समर्थ कल्याण याने 97.40% गुण मिळवून प्राप्त केला आहे.यामध्ये 90% च्या पुढे 16 विद्यार्थी असून 80%च्या पुढे 49 विद्यार्थी आहेत.विद्यालयाने हे SSC परीक्षेत अभूतपूर्व यश मिळवत उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे.विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे, पालकांचे,मार्गदर्शक शिक्षकांचे, विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री रमेश जाधव,उपमुख्याध्यापक श्री कल्याण देवडे,प्राचार्य श्री पोपट मोरे व माजी प्राचार्य श्री झाकीर शेख यांचे अभिनंदन स्थानीक स्कूल कमिटीचे सदस्य व संस्थेचे जनरल बॉडी सदस्य श्री सदाशिव(बापू) सातव यांनी केले.