प्रतिनिधी – के के आय बुधराणी हॉस्पीटल पुणे व कै.बाबुराव दादा बेलदार पाटील सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विदयमाने कॉम्पुटरवर मोफत नेत्र तपासणी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 130 लोकांची तपासणी करण्यात आली, तसेच लोकांना अल्पदरात चष्म्यांचे वाटप करण्यात आले. तसेच लोकांना अल्पदरात मोतीबिंदु शस्त्रक्रियेसाठी के के आय बुधराणी हॉस्पिटल पुणे येथे 5/5/2022 रोजी पाठविण्यात येणार आहे. यावेळी ॲड. बळवंत भगवान बेलदार पाटील व दत्तात्रय बेलदार पाटील , श्रीकांत झोरे, झांबरे , परिसरातील नागरिक व बुधराणी हॉस्पीटल चा स्टाफ, नेत्रचिकित्सक मजूर शेख, श्री.अमन मंडले, श्री.अक्षय बोडरे इत्यादी उपस्थित होते.