प्रतिनिधी – ग्रामसुरक्षा दल अंजनगाव मधील ग्रामसुरक्षा दलातील युवकांना श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन श्री बाळासाहेब परकाळे, माजी संचालक दादासाहेब मोरे, माजी सरपंच दिलीप दादा परकाळे, पोलीस पाटील ईश्वर खोमणे , माजी सरपंच सुभाष आबा परकाळे, माजी उपसरपंच मिलिंद मोरे, व उपसरपंच सुभाष तात्या वायसे तसेच तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष दादासाहेब कुचेकर यांचे उपस्थिती मध्ये टी-शर्ट चे वाटप करण्यात आले. तसेच ग्रामसुरक्षा दल अंजनगाव अध्यक्षपदी तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष श्री दादासाहेब कुचेकर यांची निवड करण्यात आली. यावेळी बाळासाहेब परकाळे व मिलिंद मोरे यांनी ग्रामसुरक्षा दलातील युवकांना ग्राम सुरक्षा संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच टी शर्ट चा वापर हा रात्रीच्या वेळी गस्त देताना किंवा ग्रामसुरक्षा दलातील महत्त्वाच्या कामानिमित्त करण्याचे ठरले आहे.