एसटी कर्मचाऱ्यांचा संयम तुटला…

प्रतिनिधी – महा विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या घरावर आज एसटी कर्मचाऱ्यांनी गनिमीकावा करत घेराव घातला, अचानक बहुसंख्येने आलेल्या ST कर्मचाऱ्यांमुळे पोलीस आणि सुरक्षा रक्षकांची ही धांदल उडाली. दरम्यान या कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या नावाने घोषणा देत घरावर चप्पल फेक केल्या व महिला कर्मचाऱ्यांनी, आंदोलकांनी शरद पवारांच्या अंगनात बांगड्या फोडून टाहो केला, यावेळी कर्मचाऱ्यांनी भावना व्यक्त करताना हे सर्व षडयंत्र शरद पवार यांचेच आहे अशा भावना व्यक्त केल्या व सध्या तणावपूर्ण परिस्थिती असून कर्मचारी काहीही ऐकण्यास तयार नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *