बारामती : (प्रतिनिधी : रियाज पठाण.) सर्वधर्मसमभाव जयंती उत्सव समिती तर्फे प्रतीक जोजारे यांच्या संकल्पनेतून बारामती शहरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रत्येक मान्यवरांना फेटे बांधून त्यांचा सत्कार करण्यात आला. मिरवणूक मध्ये येणाऱ्या शिवभक्तांना बिसलरी बॉटल पाणी वाटप करण्यात आले. समितीचे अध्यक्ष मोहिन शेख, उपाध्यक्ष चैतन्य गालिंदे, खजिनदार सुरज ओव्हाळ, कार्याध्यक्ष अक्रम बागवान, खजिनदार रोहित साळुंके, सहखजिनदार केदार पाटोळे, मार्गदर्शक गणेश गालिंदे ,योगेश महाडिक, सचिन सोनवणे ,वशिम शेख, आदिल तांबोळी, जमिर महंत, करीम तांबोळी, सुमित गालिंदे यांनी यावेळी विशेष परिश्रम घेतले. व बारामती शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व पोलीस अंमलदार व बारामती मधील सर्व पत्रकार बंधू यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *