प्रतिनिधी – काल दिनांक 11/01/2022 रोजी मौजे- सायंबाचीवाडी येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत तृणधान्य विकास कार्यक्रम रब्बी ज्वारी प्रकल्पतील शेतीदिन व शास्त्रज्ञ भेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रममध्ये लबडे सर यांनी खत व्यवस्थापन या विषयी तसेच भीमराव लोणकर कृषी सहाय्यक यांनी फोरोमन ट्रॅप व खोडवा ऊस व्यवस्थापन तसेच पाचट कुजविने या विषयी मार्गदर्शन केले. तसेच कृषि विभागाच्या विविध योजना विषयी माहीती कृषि सहायक तृप्ती गुंड यांनी दिली. या कार्यक्रमास गावातील प्रगतीशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.