केंद्र शासन पुरस्कृत शिष्यवृत्ती योजनेस 15 जानेवारी पर्यंत मुदतवाढ

पुणे, दि.11 :- उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्र शासन पुरस्कृत शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात लाभ घेण्यासाठी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्यास 15 जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

केंद्र शासन पुरस्कृत अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती, महाविद्यालयीन व विद्यापीठीय विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल सेक्टर स्कॉलरशिप, दिव्यांगजन विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेचा केंद्र शासन पुरस्कृत शिष्यवृत्तीचा www.scholarships.gov.in या संकेतस्थळावरुन लाभ देण्यात येतो. विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन उच्च शिक्षण विभागाचे शिक्षण सहसंचालक डॉ. किरणकुमार बोंदर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *