(प्रतिनिधी- गणेश तावरे) जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्रजी माध्यम भिकोबानगर पणदरे येथे सचिन सातव यांची दि बारामती सहकारी बँक चेअरमनपदी नियुक्ती झाली तसेच संभाजी होळकर, दत्तात्रय येळे, यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बिनविरोध निवड झाली व देवेंद्र शिर्के यांची दि बारामती सहकारी बँक बारामती संचालकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सत्कार मनोगत मध्ये सचिन सातव यांनी जिजाऊ ज्ञान मंदिरचे कौतुक करून ग्रामीण भागात असलेल्या लोकांसाठी ही एक पर्वनी आहे. असे कौतुक केले याचबरोबर त्यांनी ५१,००० देणगी कारभारी आण्णा चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून जाहीर केली. दत्तात्रय येळे यांनी सुध्दा जिजाऊ ज्ञान मंदिरचा वाढता आलेख कायम ठेवावा व त्यासाठी त्यांनी २१,००० वैयक्तिक देणगी बरोबर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून दरवर्षी एक लाख प्रमाणे मदत देण्याचे जाहीर करण्यात आले. देवेंद्र शिर्के यांनी ११,००० देणगी स्वरुपात जाहीर करण्यात आली. तत्पूर्वी स्वागतपर प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष शिवश्री विनोद जगताप यांनी संस्थेचा प्रवास कसा खडतर परिस्थिती मध्ये झाला. याचा लेखाजोखा मांडला सर्व मान्यवरांच्या वतीने शिवश्री विनोद जगताप व प्रिंसिपल शिवमती विनोद जगताप यांना या काळातील जोतिबा व सावित्री म्हणून सन्मानित करण्यात आले. यावेळी बारामती दूध संघ चेअरमन संदीप जगताप, मा संचालक माळेगाव सहकारी साखर कारखाना अमरसिंह जगताप, माळेगाव सहकारी साखर कारखाना संचालक मंगेश जगताप, माळेगाव सहकारी साखर कारखाना संचालक स्वप्निल जगताप, मा अध्यक्ष संजय गांधी निराधार किरण तावरे, सांगवी ग्रामपंचायत सदस्य विजय तावरे, मा बारामती दूध संघ संचालक अशोक भाऊ जगताप, धुमाळवाड ग्रामपंचायत सरपंच कविता सोनवणे, धुमाळवाडी ग्रामपंचायत उपसरपंच वृषाली मोटे, पवईमाळ पोलिस पाटील रोहीत जगताप, सांगवी ग्रामपंचायत सदस्य विलास आडके ,हर्षल कोकरे, संतोष मचाले, राजेंद्र भोईटे, विक्रम जगताप, संग्राम जगताप, पप्पू महाराज, रामभाऊ मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन उपमुख्यध्यापिका योगिता कांबळे यांनी केले. आभार डि डि जगताप यांनी मानले या कार्यक्रमासाठी पालक, ग्रामस्थ, शिक्षक स्टाफ, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.