पुणे दि. 6: कँटोन्मेंट आणि कोथरुड अशा दोन ठिकाणी मुलींची शासकीय वसतिगृह सुरू करण्यात येणार असून या वसतिगृहसाठी सर्व सोईसुविधायुक्त खासगी इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याणच्या सहायक आयुक्त श्रीमती संगिता डावखर यांनी केले आहे.

2022-23 या शैक्षणिक वर्षापासून ही दोन वसतिगृहे भाड्याच्या इमारतीत सुरू करण्यात येणार आहेत. या इमारतींमध्ये क्षमतेनुसार खोल्या असणे आवश्यक असून वीज, पाणी, शौचालय, बाथरुम आदी सर्व प्राथमिक सुविधा आवश्यक आहेत.

ही वसतिगृहे सुरू होण्याच्या दृष्टीने इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्या वसतिगृहाच्या परिसरातील इच्छुक इमारत मालकांनी सहायक आयुक्त समाजकल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन स.नं.105/104, विश्रांतवाडी रोड, येरवडा स्टेशनसमोर, येरवडा, पुणे (दूरध्वनी 020-29706611) येथे संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed