बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुविद्य पत्नी तथा बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सौ सुनेत्रा पवार यांच्या शुभहस्ते बारामतीतील प्रभाग क्रमांक ३ येथे ५ कोटी ५८ लाख रुपयांच्या विविध विकास कामाची सुरुवात झाली. यामध्ये छत्रपती संभाजी महाराज मार्ग एकात्मिक पद्धतीने विकसित करणे ३ कोटी २४ लाख, त्रिमूर्तीनगर अंतर्गत रस्ते ३५ लाख, अहुजा बिल्डिंग ते आगवणे घर रस्ता ७६ लाख, छत्रपती शिवाजी महाराज नगर अंतर्गत रस्ते ५० लाख, बापू शेरे घर ते बापू ठोंबरे घर रस्ता १२ लाख, कांचन नगर अंतर्गत रस्ते २७ लाख, भाई कोतवाल सोसायटी सामाजिक सभागृह ३४ लाख, आदि विविध विकास कामाचे बारामतीतील प्रभाग क्रमांक ३ येथे ५ कोटी ५८ लाख रुपयांच्या शुभारंभ बारामती टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्ष सौ सुनेत्रा पवार यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी त्या म्हणाल्या की विकासात्मक, दर्जेदार कामे व्हावीत या करिता, नागरिकांनीच विकसित कामांकडे लक्ष केंद्रित करावे. या कार्यक्रमाचे अध्यक्षा पौर्णिमा तावरे, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विद्यमान ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, राजेंद्र (आबा ) बनकर, मुख्याधिकारी महेश रोकडे, श्री.गायकवाड, मोरे, उद्यानविभागाचे कर्मचारी, पंचायत समितीचे गटनेते दीपक मलगुंडे, विद्यमान नगरसेवक बिरजू मांढरे, नगरसेवक सुधीर पानसरे, बबलू जगताप, अभिजीत चव्हाण, कुणाल गालिंदे, नगरसेविका नीलिमा मलगुंडे, अनिता जगताप, मयुरी शिंदे, सई सातव, निता चव्हाण, अतुल बालगुडे, अमर धुमाळ, अमजद बागवान, जेष्ठ स्थानिक नागरिक व महिला वर्ग, नगरसेवक, नगरसेविका आदीच्या उपस्थितीत विविध विकास कामाचा शुभारंभ तर कार्यक्रमाचा समारोप श्रीरामनगर, भाई कोतवाल सोसायटी सामाजिक सभागृह येथे झाला. सूत्रसंचालन श्री बागवान सर यांनी केले तर प्रस्ताविक श्री सूर्यवंशी यांनी केले.