बारामती ( प्रतिनिधी, इंद्रभान लव्हे )- दि 30 जुलै – महाड येथील तळीये गावात दरडी कोसळल्या नंतर त्या ठिकाणचे मोठे नुकसान झाले होते. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रातून मदतीचा ओघ सुरू झाला. कोणी अन्नधान्य दिलं, कोणी कपडे दिले, कोणी गोळ्या-औषध दिलेत तर कोणी पैसे स्वरूपात मदत केली. बारामतीमधील पार्थ प्रवीण गालिंदे (सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे जिल्हा) यांनी देखील या सामाजिक कार्यामध्ये खारीचा वाटा उचलत प्रेरणा सोशल फाउंडेशन मार्फत 100 लोक उपयोगी किट चे वाटप केले. पार्थ गालिंदे हे लोकोपयोगी कार्यक्रमांमध्ये नेहमीच पुढाकार घेऊन मदत करत असतात. यापूर्वी देखील अनेक गोर-गरीब, गरजू नागरिकांना त्यांनी मदत केली आहे. दरम्यान आमच्या प्रतिनिधीशी बोलताना गालिंदे यांनी सांगितले की माझ्यापरीने मी छोटीशी मदत करण्याचा प्रयत्न करत असतो.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून अशा कामाची प्रेरणा मिळत असते. यापुढेही अशाच कामातून लोकसेवा करत राहील व पक्षाच्या माध्यमातून गोरगरिबांना न्याय देण्याचा प्रयत्न करत राहील.