प्रतिनिधी – कृषी विभाग संलग्न पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन 2023-24 अंतर्गत मौजे मळद ग्रामपंचायत येथील संयुक्तीक गट प्रशिक्षण राबविण्यात आले. सदर कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून सौ सुप्रिया बांदल तालुका कृषी अधिकारी बारामती यांनी एकता नैसर्गिक सेंद्रिय गटा च्या बोर्डाच्या अनावरण करून गट स्थापना करून सेंद्रिय शेती समजावून सांगितले . कृषी विभागाचे अधिकारी श्री पिसे साहेब यांनी गांडूळ खताविषयी माहिती दिली. श्री राहुल भट यांनी सेंद्रिय शेती विषयी सखोल असे मार्गदर्शन केले, श्री अतुल सराफ यांनी जमिनीची प्रत सुधारून नैसर्गिक शेती करणे या विषयी मार्गदर्शन केले व महिला शेतकरी शांतिदूत परिवाराच्या अध्यक्षा सौ सारिका शिरोळे पुणे यांनी शेतातील पिकवलेला माल, त्याची प्रतवारी, बाजारपेठ याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले. यावेळी श्री सुभाष बोराटे मंडळ कृषी अधिकारी बारामती, श्री शहाजी काका गावडे संचालक बारामती दूध उत्पादक संघ, कृषी पर्यवेक्षक सौ मीरा राणे, मळद ग्रामविकास अधिकारी श्री चांदगुडे, मळदच्या महसूल अधिकारी सौ कांता देशमुखे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकता शेतकरी समूहाचे अध्यक्ष श्री. प्रशांत शेंडे यांनी केले. मान्यवरांचे स्वागत एकता नैसर्गिक गटाचे अध्यक्ष श्री नानासो गावडे व एकता नैसर्गिक गटाचे सचिव श्री मनीष हिंगणे आभार प्रदर्शन सौ मनीषा काजळे यांनी केले. महिला शेतकरी व शेतकरी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.