‘हर घर तिरंगा २.०’ अभियानाअंतर्गत राष्ट्रीय ध्वज टपाल कार्यालयात विक्रीसाठी उपलब्ध

बारामती, दि. १०: स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित या वर्षीही ‘हर घर तिरंगा २.०’ अभियान राबविण्यात येत असून या अभियानाअंतर्गत नागरिकांना राष्ट्रीय ध्वज उपलब्ध होण्यासाठी नजीकच्या टपाल कार्यालयात विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत, अशी माहिती बारामती डाक विभागाचे अधीक्षक दिलीप सर्जेराव यांनी दिली आहे.

स्वातंत्र्यसंग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारक यांच्या आठवणी, देशभक्तीची भावना जनमानसात कायम रुजावी या उद्देशाने गतवर्षी ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात आले होते. या अभियानास नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. देशाबद्दल असलेला अभिमान आणि स्वातंत्र्यदिनाचे स्मरण करण्यासाठी यावर्षी ‘हर घर तिरंगा २.०’ अभियान राबविण्यात येत आहे.

या अभियानाअंतर्गत राष्ट्रीय ध्वजांची विक्री आणि वितरण टपाल कार्यालयातून करण्यात येत असून जवळच्या टपाल कार्यालयात २५ रुपयांत राष्ट्रीय ध्वज विक्रीकरीता उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच नागरिकांना www.epostoffice.gov.in या संकेतस्थळावर राष्ट्रीय ध्वज ऑनलाइन खरेदीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

कार्यालयाच्या [email protected] या ई-मेल पत्त्यावर राष्ट्रीय ध्वज मागणीबाबत नोंदणी करता येईल. अधिक माहितीसाठी ९८३४५१५३९२, ९१४५५१०८९४ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. शासकीय कार्यालये, खासगी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थानी राष्ट्रीय ध्वज मागणीसाठी नजीकच्या डाक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. सर्जेराव यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *