बारामती : बारामती तालुका साऊंड लाईट जनरेटर असोशियन यांची न्यू अक्षदा मंगल कार्यालय मध्ये वार्षिक आढावा बैठक संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये स्पीकर व्यवसायावर येणाऱ्या अडचणीवर चर्चा संपन्न झाली. या चर्चेमध्ये सर्वांनुमते साऊंड ची नियमावली तयार करण्यात आली आहे. सदर नियमावलीची प्रत अप्पर पोलीस अधीक्षक , बारामती शहर पोलीस स्टेशन यांना देण्यात आली आहे.बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी योग्य मार्गदर्शन केले व नियमावलीच्या बाहेर जे साऊंड लावतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा आश्वासन दिले आहे.अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष शरद सोनवणे यांनी दिली. अध्यक्ष शरद सोनवणे, उपाध्यक्ष संतोष शिंदे,. सेक्रेटरी राहुल गायकवाड, उप सेक्रेटरी अरविंद माने, खजिनदार योगेश सोनवणे ,उपखजनदार गणेश भोसले, कार्याध्यक्ष गणेश सरवदे व ज्येष्ठ सभासद विकास सोनवणे व कानिफ शेठ नागे प्रशांत भोईटे यांच्या उपस्थित बैठक संपन्न झाली.