नानासाहेब साळवे
प्रतिनिधी – बालाजी तांबे यांनी लोणावळ्याजवळील कार्ला येथील ‘आत्मसंतूलन व्हिलेज’ या प्रकल्पाच्या माध्यमातून आयुर्वेदाच्या माध्यमातून लोकांची सेवा केली. आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं निधन झालं आहे. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बालाजी तांबे यांनी आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसारासाठी मोठं कार्य केलं. बालाजी तांबे यांनी आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यावर संशोधन केले आहे. बालाजी तांबे यांनी मेकॅनिकल इंजिनीअरचीही डिग्री घेतली होती. लोणावळ्याजवळील कार्ला येथील ‘आत्मसंतूलन व्हिलेज’ या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी आयुर्वेदाच्या माध्यमातून लोकांची सेवा केली. अनेक आजारांवर आयुर्वेदाच्या माध्यमातून त्यांनी उपचार केले. विविध आयुर्वेदिक औषधांची संशोधन करुन त्यांनी निर्मितीही केली. त्यांच्या देशभरातूनच नव्हे तर परदेशातूनही रुग्ण उपचारासाठी येत असत.