जिजाऊ ज्ञान मंदिर शाळेचा उपक्रम
माळेगाव ( प्रतिनिधी, गणेश तावरे ) मंगळवार दि. ३.०८.२१ रोजी जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल भिकोबानगर पणदरे बारामती यांनी जाहीर केल्याप्रमाणे ज्या मुलांचे आई किंवा वडील कोरोना मारामारी मध्ये मॄत पावले आहेत त्या मुलांचे १० वी पर्यंत मोफत शिक्षण देण्यात येईल त्यानुसार ५ मुलांचे मोफत ॲडमिशन केले. तसेच शालेय उपयोगी वस्तूंचे विवरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. समाजाचे काहीतरी देणे घेणे लागतो त्यानुसार सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकण या ठिकाणी आलेल्या महापूर व पूराने विस्कळीत झालेले जनजीवन याला हातभार म्हणुन जिजाऊ ज्ञान मंदिर इग्लिश मिडीयम स्कूल भिकोबानगर यांनी केलेले आव्हान पालकांनी ,ग्रामस्थांनी जीवनावश्यक वस्तूं तसेच जिजाऊ ज्ञान मंदिर भिकोबानगर धनादेश चेक ५०००/- रूपयांचा प्रशासनाकडे सूपूर्त केला. या कार्यक्रमासाठी मीनाक्षी ताई तावरे, जि.प.सदस्या सांगवी डोरलेवाडी , गणेशजी कवितके साहेब ( P.S.I )पणदरे , मीनाक्षी काकी जगताप सरपंच ग्रामपंचायत पणदरे, कविताताई सोनवणे सरपंच ग्रामपंचायत धुमाळवाडी, संतोष मचाले सर , स्वाती जगताप, अतुल जगताप सरपंच ग्रामपंचायत पवईमाळ, सचिव नितीन जगताप.
स्वागत व सूत्रसंचालन योगिता कांबळे व मनिषा जगताप. प्रास्ताविक- संस्थेचे अध्यक्ष व जिल्हा सचिव संभाजी ब्रिगेड पुणे शिवश्री विनोद जगताप सर यांनी केले . सर्व मान्यवरांनी जिजाऊ ज्ञान मंदिरचे कौतुक करून त्या मुलांचे शाळेने जी जबाबदारी स्वीकारली त्याला आम्ही सढळ हाताने मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी पालक वर्ग यांनी आॅनलाईन शिक्षणामुळे मुलांचे फार नुकसान होत आहे. यासाठी शासनाने शाळा सुरू करणे बाबत निवेदन गणेशजी कवितके प्रशासन मीनाक्षी ताई तावरे शासनाकडे पाठपुरावा करण्याची विनंती केली. आभार प्रिसिंपल शिवमती स्वरांजली विनोद जगताप यांनी मानले. हा कार्यक्रम सोशल डिसंट्स चा वापर करून यशस्वी वाटचालीसाठी स्कूलच्या शिशक स्टाप, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले.