वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून अनाथ मुलांना स्नेह भोजन..!

सेवक अहिवळे यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकास्पद उपक्रम

बारामती (दि:६) अलीकडच्या काळात वाढदिवस साजरा करणे हा खूप मोठा इव्हेंट झाला आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने खूप मोठा खर्चही केला जातो. परंतु, बारामतीतील होलार समाजाचे युवा नेतृत्व सेवक अहिवळे यांनी वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून बारामतीतील तारा टॉकीज येथील मिशन बॉईज होम या अनाथ आश्रमात लहान मुलांना स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

वाढदिवस साजरा करताना नागरिक विनाकारण अवाढव्य खर्च करत असतात. हा अनावश्यक खर्च टाळून आपण समाजासाठी काही तरी देणे असते. या भावनेतून सामाजिक बांधिलकी जपत सेवक अहिवळे यांनी अनाथ आश्रमात लहान मुलांना स्नेह भोजन देऊन त्याच्यासोबत केक कापत वाढदिवस साजरा केला. यावेळी समाजातील विविध पदाधिकारी कार्यकर्ते, युवक वर्ग तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *