काजु फळपिकावरील प्रमुख किडींच्या व्यवस्थापनाबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

काजु फळपिकावरील प्रमुख किडींच्या व्यवस्थापनाबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

पुणे, दि. १४:- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्स्वी वर्षानिमित्त कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम २०२१-२२ मध्ये राबविण्यात येणाऱ्या मोहिमेअंतर्गत ‘काजु फळपिकावरील प्रमुख किडींचे व्यवस्थापन’ या विषयांबाबत २५ जानेवारी रोजी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

    विकेल ते पिकेल अभियानातंर्गत 'चर्चा करु शेतीची कास धरु प्रगतीची' या वेबीनार मालिकेचे दर बुधवारी प्रसारण होते. या मालिकेच्या २५ जानेवारी रोजीच्या  ६८ व्या भागाकरीता कृषी आयुक्तालयाचे फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते आणि वेंगुर्ला प्रादेशिक फळसंशोधन केंद्राचे कीटक शास्त्रज्ञ डॉ.व्ही.एस.देसाई हे काजु फळपिकावरील प्रमुख किडींच्या व्यवस्थापनबाबत मार्गदर्शन करणार आहेत.          हा कार्यक्रम कृषि विभागाच्या युट्युब https://www.youtube.com/c/AgricultureDepartmentGoM  या लिंकवरुन शेतकऱ्यांना बघता येईल. 

     प्रत्येक मंडळ कृषि अधिकारी कार्यक्षेत्रामध्ये क्षेत्रीय स्तरावर २५ जानेवारी रोजी 'काजु फळपिकावरील प्रमुख किडींच्या व्यवस्थापन' या विषयांबाबत किमान एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्येर शेतकरी- शास्त्रज्ञ परिसंवाद, क्षेत्रीय भेटी, शेतीशाळा, शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम, शेतकरी सभा आदी आयोजित केले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी कृषि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, संशोधन संस्थाचे शास्त्रज्ञ, काजु पिकामधील प्रगतशील शेतकरी व कृषि विभागाचे तज्ज्ञ अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते यांनी केले आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )