ए .आर .सी पब्लिक स्कूल कारंजा घाडगे येथे कारंजा तालुक्यातील यशस्वी महिला अरुणा ताई राम चापले यांचा सत्कार

बारामती (प्रतिनिधी गणेश तावरे) जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकीचा अभियान या अंतर्गत ए .आर .सी पब्लिक स्कूल तर्फे कारंजा तालुक्यातील सर्वात यशस्वी महिला श्रीमती अरूनाताई राम चापले यांचा सत्कार करण्यात आला या वेळी डॉ दुधे मॅडम ,आशा वर्कर कविता तेलरांधे प्रमुख अतिथी होत्या ,सर्व स्त्रियांना प्रेरणा ठरणाऱ्या तसेच अत्यंत हल्लाकीच्या परिस्थितीत कुटुंबाची धुरा सांभाळून शिक्षण क्षेत्रात आपला जम बसविणाऱ्या अरुणा ताई सर्व स्त्रियांना एक आदर्श ठरत आहेत .त्यांच्या मुलाखती दरम्यान त्यांनी आलेल्या अडचनिंना कसे तोंड दिले व त्यातून त्यांनी कसा मार्ग काढला हे त्यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांना सांगितले तेव्हा खरच असं वाटलं की एकट्या स्त्रीला समोर जाणे खूप कठीण आहे पण त्यांनी ते करून दाखविले त्यांची राजीव गांधी स्टेट बोर्ड तसेच ए .आर .सी पब्लिक स्कूल सीबीससी अश्या दोन संस्था आहेत .व या दोन्ही शाळेचा कारभार त्या स्वतः बघतात येथे त्यांच्या मदतीला त्यांचा मुलगा पियुष चापले तत्पर असतो .त्यांची मुलाखत सौ सारिका नासरे यांनी घेतली .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बुशरा पठाण यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ सारिका सातपूरे मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन सरोज मॅडम यांनी केले .काल दिनांक 7 जानेवारी रोज शुक्रवार ला कारंजा शहरातील ए .आर .सी पब्लिक स्कूल येथे कारंजा तालुक्यातील यशस्वी महिला अरुणा ताई राम चापले यांचा सत्कार करण्यात आला .जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकीचा अभियान राबविण्याचे निर्देश एका परिपत्रकाद्वारे राज्य शासनाने दिले आहेत या उपक्रमाअंतर्गत ए .आर .सी पब्लिक स्कूल येथे हा यशस्वी महिला चा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला . राष्ट्रीय युवा उदय संस्था नागपूर च्या अध्यक्षा व शहरातील राजीव गांधी कॉन्व्हेंट शाळेच्या संस्थापिका अरुना राम चापले यांनी अगदी कमी वयात खूप मोठा संघर्ष करून शून्यातून विश्व निर्माण केलं व तालुक्यातील यशस्वी महिला चा गौरव प्राप्त केला . अरुनाताई च्या संघर्षाला प्रेरणा समजून मुलींनी मजबूत वाहायला पाहिजे असं मत कार्यक्रमाच्या अध्यक्षा सारिका नासरे यांनी व्यक्त केले . या कार्यक्रमा निमित्य अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं होते . या वेळी सत्कार कार्यक्रमाला राष्ट्रीय युवा उदय संस्था नागपूर च्या अध्यक्षा अरुणा ताई राम चापले ,डॉक्टर दुधे , उप मुख्यधापिका सारिका सातपूरे ,जेष्ठ शिक्षिका सारिका नासरे , प्रदीप उके ,स्नेहा मनवर ,किसन मात्रे ,आकांशा यादव ,ललित मस्के ,अमोल केलझलकर ,उमेश साठवणे ,नेहा चौधरी , बुशरा पठाण ,शाळेतील शिक्षक शिक्षिका व शाळेतील संपूर्ण विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *