बारामती नगर परिषदेकडून सौर ऊर्जा मेळावा संपन्न.

प्रतिनिधी – स्वच्छ सर्वेक्षण २०२३ व माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत बारामती नगर परिषद चे मुख्याधिकारी श्री महेश रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सौर ऊर्जा मेळावा संपन्न झाला.

माझी वसुंधरा अभियान ३.० मधील पंचतत्वा पैकी ‘अग्नी’ तत्वा अंतर्गत अपारंपारिक ऊर्जा वापराचा प्रचार करण्यास विशेष महत्त्व दिले गेले आहे. त्याअंतर्गत बारामती नगरपरिषदे कडून सौर ऊर्जा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर मेळाव्या करिता बारामती शहरातील उद्योजक, व्यापारी, डॉक्टर्स, महिला मंडळ आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सद्यस्थितीच्या पारंपारिक ऊर्जा स्रोतांच्या वापरामुळे होणारे निसर्गाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे म्हणून जास्तीत जास्त सौर ऊर्जा चा वापर कसा करता येईल, सोलार एनर्जी वापराचे फायदे, नेट मीटरिंग द्वारे बिलिंगची प्रोसेस आणि सोलार वर मिळणारी सबसिडी. याबाबत माहिती इत्यंभूत मार्गदर्शन महाराष्ट्र सोलार मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन चे अध्यक्ष समीर गांधी यांनी दिली.

सोलार बसवण्याकरिता कर्ज सुविधेबद्दलची माहिती कॉसमॉस बँकेचे श्री. अतुल ओव्हाळ यांनी दिली. महावितरण कडून लागणारे सहाय्य आणि नेट मीटरिंग कनेक्शन बद्दलची माहिती महावितरणचे कनिष्ठ अभियंता श्री. सचिन साळुंखे यांनी दिली.

सदरील सौर ऊर्जा मेळाव्यात नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला व मेळाव्याच्या शेवटी सोलार एनर्जी वापर आणि इन्स्टॉलेशन बाबत शंकांचे निरसन करण्याकरिता प्रश्नोत्तराचे सत्र पार पडले.

या मेळाव्याकरिता बारामती नगर परिषद मुख्याधिकारी श्री महेश रोकडे, बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष श्री. धनंजय जामदार, इत्यंभूत मार्गदर्शन महाराष्ट्र सोलार मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन चे अध्यक्ष समीर गांधी, कॉसमॉस बँकेचे श्री. अतुल ओव्हाळ, महावितरणचे कनिष्ठ अभियंता श्री. सचिन साळुंखे, बारामती नगर परिषदेच्या सर्व विभागांचे विभाग प्रमुख, कर्मचारी,अक्षय नाईक, सोशल लॅब एन्व्हारमेंटल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड चे प्रतिनिधी आणि शहरातील एकूण 41 नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *