माळेगाव (प्रतिनिधी, गणेश तावरे ) :- वेगळ्या गोष्टी करण्यापेक्षा प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करण्याची खासियत असणाऱ्या मानाजीनगर ग्रामविकास मंचाने काल बाप्पाचे आगळेवेगळे असे स्वागत केले . काल गणेशोत्सव त्या औचित्याने मानाजीनगर ग्रामविकास मंचाच्या वतीने पताका लावून वृक्षारोपण सोहळा करण्यात आले , त्यामध्ये 8 झाडे लावण्यात आले त्याचे कारणही तसेच की गजाननाची 8 रूपे त्यामुळे प्रत्येक रोपण केलेल्या झाडाला अष्टविनायकाचे नाव देण्यात आले. तात्पर्य असे की मंचाने झाडांच्या माध्यमातूनच गणेशाच्या 8 रुपांची स्थापना केली. उल्लेखनीय बाब म्हणजे वास्तविकतः आज प्रत्येक सदस्यला आपल्या घरी गणपती बसविण्याची घाई असली तरी देखील या पवित्र कार्यामध्ये नेहमीप्रमाणेच लहानापासून थोरांपर्यंतचा उत्स्फूर्तपणे असलेला सहभाग सहजनजरेतून जाणवत होता. हे कार्य पाहता असे वाटते की पुढच्या पिढीवर येणारे अनेक व्हायरल संकटं हे वृक्षरुपी अष्टविनायक पळवून लावून संकटमोचने ठरतील हे मात्र कोणीच नाकारू शकत नाही. असे मत मंच च्या सभासदांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *