प्रतिनिधी – भारतरत्न प.पू. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे 131 व्या जयंती महोत्सवानिमित्त दिनांक 15 एप्रिल रोजी चंद्रमणी नगर बुद्धविहार येथे सौ आरती गव्हाळे यांच्या आयोजनाने व के आर अष्टेकर ज्वेलर्स यांच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या होम मिनिस्टर या महिलांच्या कार्यक्रमास चंद्रमणी नगर हौसिंग सोसायटी व अमराई परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सदर प्रोग्राम मध्ये महिलांनी अतिशय चांगल्या पद्धतीने खेळांचा आनंद घेतला. कार्यक्रमामध्ये बारामती परिसरातील प्रसिद्ध समालोचक श्री ज्ञानेश्वर मामा जगताप यांनी केलेल्या मनोरंजना मुळे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी भर मिळाली. या कार्यक्रमांमध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी आम्रपाली साबळे, द्वितीय क्रमांकाची मानकरी विद्या सोनवणे, तृतीय क्रमांकाची मानकरी राणी भोसले, या तिघींना पैठणी साडी व दहा ग्रॅम चे चांदीचे नाणे बक्षीस म्हणून देण्यात आले. हा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे चंद्रमणीनगर सोसायटी मधील महिलांनी माजी नगरसेविका आरती गव्हाळे यांचे कौतुक केले व विशेष आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *