अडीच हजार शिवभक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ….
बारामती (दि:१६)
बारामती होलार समाजाच्या वतीने शिखर शिंगणापूर यात्रेनिमित्त बारामतीत अनंत आशा नगर या ठिकाणी कावडीतील सर्व शिवभक्तांसाठी तसेच नागरिकांसाठी महाप्रसाद व अन्नदानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्या हस्ते महादेवाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, नगरसेवक बिरजू मांढरे, नगरसेवक राजेंद्र बनकर, मा.नगरसेवक अभिजीत चव्हाण उपस्थित होते.
सालाबादप्रमाणे शिखर शिंगणापूर येथे होलार समाज सेवाभावी संस्थेच्या वतीने (दि:१३) रोजी कावडीतील सर्व शिवभक्तांसाठी महाप्राद तसेच अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जवळपास अडीच हजार शिवभक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. दरम्यान अन्नदानाचे हे यंदा ४४ वे वर्ष होते. तसेच या महाप्रसादाचा लाभ सर्व बारामतीकरांना सुधा मिळावा यासाठी बारामतीत देखील (दि:१५) रोजी महाप्रसादाचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले होते. दरम्यान यावेळी देखील शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणात या महाप्रसादाचा लाभ घेतला.
हा आयोजित भंडारा पार पाडण्यासाठी होलार समाज सेवाभावी संस्थेतील पदाधिकारी कार्यकर्ते तसेच तरुणांनी मोठे परिश्रम घेतले