प्रतिनीधी : वैष्णवी क्षीरसागर, – मळद गावचे विद्यमान सरपंच श्री योगेश बनसोडे यांना आज रोजी सापडलेला अकरा हजार रुपयेचा धनादेश.. त्यांनी ज्याचा होता त्याला सुपूर्द केला.आज गोविंद बाग शारदानगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जमले होते. तेथून परत येत असताना शारदा नगर परिसरात श्री योगेश बनसोडे यांना श्री दिनेश दिलीप जगताप यांच्या नावावरील अकरा हजार रुपयांचा धनादेश सापडला. त्यांनी ही बाब श्री नितीन दादा शेंडे यांच्या कानावर घातली. त्यांनी ताबडतोब लगेच फोनाफोनी करून शोध घेतला. आमराई भागातील सामाजिक कार्यकर्ते बबलू जगताप यांचा तो चेक होता. ताबडतोब त्यांचे कार्यकर्ते श्री वाघमोडे यांचेकडे तो चेक सुपूर्द केला. याप्रसंगी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल कार्याध्यक्ष श्री नितीन दादा शेंडे, माजी सरपंच श्री धनंजय भाऊ गवारे, श्री दादाराम झगडे, श्री राजकुमार पोतेकर बापू, माजी उपसरपंच श्री युवराज नाना शेंडे यांच्या उपस्थितत योगेश बनसोडे यांनी हा चेक श्री वाघमोडे यांना सुपूर्द केला. याप्रसंगी बबलू जगताप यांनी सरपंचाचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *